You are currently viewing मकर संक्रमण

मकर संक्रमण

प्रा.दिलीप सुतार, कुरुंदवाड यांची मकरसंक्रांतीच्या दिवसाचे महत्त्व सांगणारी काव्यरचना

मकर संक्रांत हा सण धार्मिक सण आहे, असे मानणे अयोग्य आहे. हा सण राष्ट्रीय सण होणे अत्यंत गरजेचे आहे. हा सण भारतातील सर्व धर्म, जाती व पंथांचे लोक एकोप्याने साजरा करू लागतील तर खर्‍या अर्थाने राष्ट्रीय एकोपा साजरा होण्यासाठी वातावरण निर्मिती होऊ शकते. सण आणि समारंभांचा उपयोग परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी, स्नेह वाढवण्यासाठी व्हावा अशी सणांमागील भारतीय मानसिकता आहे. मकर संक्रांतीचा दिन हा ‘समाज संपर्क दिन’ होण्याची आवश्यकता आहे. या निमित्ताने पुढील ओळींची आठवण करून देता येईल –
संगठन गढे चलो, सुपंथ पर बढे चलो!
भला हो जिस में देश का,
वो काम सब किये चलो!!

मकर संक्रमण

मकर राशीत ।सूर्य संक्रमण।।
स्नेहाभिसरण।वैश्विक हे।।

सूर्या त्या वंदावे।आरोग्य प्रार्थावे।।
ओज ते दिसावे। व्यक्तित्वात।।

सण संक्रांतीचा।प्रतीक प्रेमाचे।।
ऐक्य मानवाचे । साधावया।।

ह्रदयी वसावी।स्निग्धतातिळाची।।
गोडी ती गुळाची। जिभेवर।।

संत आणि सण। संदेश देतात।।
समस्त विश्वात। नांदो सौख्य।।

संक्रांत ही नाही। त्यास अपवाद।।
गोड तो संवाद। व्हावा नित्य।।

आम्ही भारतीय।सर्व भाऊभाऊ।।
सदोदित राहू । शांततेने।।

प्रा.दिलीप सुतार
कुरूंदवाड
मो नं 9552916501

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 2 =