You are currently viewing असे असावे तसे असावे….

असे असावे तसे असावे….

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*असे असावे तसे असावे….*

असे असावे तसे असावे जीवन सारे म्हणतात
जगतांना पण कारण नसता मानभावी कण्हतात ….

प्रेम द्यावे प्रेम करावे फक्त मुखाने बोलतात
पाठ वळता माणसाची ओठ वाकडे करतात …

मदत करावी सुखदु:खात समोरच्याला सांगतात
वेळ येता तशी खरोखर पाय काढता घेतात …

वरवरचे हो बोल हे सारे कृतीशून्यता सार्थक
फारच थोडे असती सज्जन दिल्या वचना जागतात …

तुम्ही व्हा पुढे आलो म्हणती तोंड काळे करतात
भ्रमात का हो दुर्जन सारे खोट्यावरती मरतात ….

कळते सारे वळत नाही असे कसे होऊ शकते?
मुठभर असती सत्यान्वेशी मार्ग नेकीचा चालतात …

त्यांच्यावरती चाले दुनिया जाणकार हे म्हणती पहा
पापे भरती येथे तरी ही पापे लोक का करतात …?

उत्तर येथे मिळत नाही सवालात सरते आयु
कुरघोडी ती संपत नाही श्वासातील सरतो वायु …

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १२/११/२०२२
वेळ : रात्री ९/४५

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 3 =