You are currently viewing जि. प., पं. स. प्रभाग आरक्षण सोडत स्थगित

जि. प., पं. स. प्रभाग आरक्षण सोडत स्थगित

कणकवली

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीची प्रभाग आरक्षण सोडत उद्या 13 जुलै रोजी होणार होती. मात्र अतिवृष्टीमुळे होणारी नैसर्गिक आपत्ती पाहता निवडणूक आयोगाने हा सोडत कार्यक्रम तूर्त स्थगित केला आहे.
दरम्यान आरक्षण सोडत कार्यक्रम स्थगिती सोबतच मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमाही तूर्त स्थगित करण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी म्हटले आहे. दरम्यान प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम स्थगित करण्यात आले असल्याने अनेक इच्छुकाना पुन्हा एकदा आरक्षण सोडतीकडे डोळे लावून बसावे लागणार आहे. पुढील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + seventeen =