You are currently viewing राष्ट्रवादीला धक्का, कौस्तुभ नाईक यांचा  मनसेत प्रवेश

राष्ट्रवादीला धक्का, कौस्तुभ नाईक यांचा  मनसेत प्रवेश

सावंतवाडी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष श्री. कौस्तुभ नाईक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित राज ठाकरे यांच्या हस्ते मनसे पक्षात प्रवेश केला.

यावेळी माजी आमदार मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर, मनसे विध्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे, सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका सचिव राजेश टंगसाळी गिरीश उपरकर धनराज गोरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. तर पक्षाशी एकनिष्ठ राहून सरचिटणीस मा आमदार उपरकर यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करून पक्षाला उभारी देऊ असे श्री नाईक म्हणाले. तर कौस्तुभ नाईक यांना लवकरच सावंतवाडीत नवीन जबाबदारी देण्यात येणार असल्याचे मनसे राज्य सरचिटणीस उपरकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा