You are currently viewing पीटी उषा, इलयाराजा यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर निवड

पीटी उषा, इलयाराजा यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर निवड

दिल्ली :

 

धावपटू पी टी उषा, प्रसिद्ध संगीतकार इलय राजा, चित्रपट कथा लेखक विजयेंद्र प्रसाद यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. या चार जणांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटी उषा, व्ही. विजयेंद्र प्रसाद गरु, वीरेंद्र हेगडे आणि इलैया राजा यांचे राज्यसभेसाठी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी पीटी उषा यांच्यासाठी ट्वीट करत लिहिले आहे की, पीटी उषाजी या प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेत. क्रीडा क्षेत्रातील त्यांची कामगिरी सर्वत्र ओळखली जाते, नवोदित खेळाडूंना गेल्या काही वर्षांत मार्गदर्शन करणारे त्यांचे कार्य तितकेच प्रशंसनीय आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three − 2 =