You are currently viewing पुन्हा एक जन्म

पुन्हा एक जन्म

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी रामदास पवार (अण्णा) लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पुन्हा एक जन्म*

 

काय असतं प्रेम हे, मला करून बघायचं

स्वप्नांच्या दुनियेत या, एकदा तरी जगायचं

 

अनुभवाचं मला काय, असतं मनात झुरणं

यासाठीच आवश्यक, आहे ना प्रेम करणं

 

स्वप्नांत माझ्या पण, कोणीतरी येऊ दे

प्रेमाचा आनंद काय, मला सुद्धा घेऊ दे

 

मग भले खुशाल तू, विरह घाल पदरात

पण प्रेम करायची, इच्छा आहे उदरात

 

आनंदाला माझ्या, तेव्हा उधाण येईल

जेव्हा माझ्यावर, कोणाला प्रेम होईल

 

मला सुद्धा प्रेमाचा, अनुभव येऊ दे

भले मग त्यासाठी, कितिही जन्म होऊ दे

 

देह वाहिला देशासाठी, का हाच माझा गुन्हा

म्हणुन प्रेम करायला, एक जन्म देशील पुन्हा

 

रामदास आण्णा

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =