You are currently viewing नांदगाव असलदे शिवाजी नगर येथे भला मोठा वृक्ष कोसळला

नांदगाव असलदे शिवाजी नगर येथे भला मोठा वृक्ष कोसळला

काही काळ देवगड निपाणी महामार्गावरील वाहतूक ठप्प

नांदगाव प्रतिनिधी

कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी महामार्ग लगत असलेल्या नांदगाव असलदे शिवाजी नगर येथील भले मोठे वडाचे झाड तर
दोन ते तीन दिवस पडत असलेल्या पावसामुळे उन्मळून पडले आहे. सदर वृक्ष हा विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईन वर कोसळल्याने पोल सहीत विद्युत तारा तुटून पडल्या आहेत.
सुदैवाने मात्र यावेळी वाहन अथवा पादचारी मार्ग ही असल्याने कोणी नव्हते म्हणून मोठा अनर्थ टळला आहे.हा वृक्ष आज सकाळी ६.४५ वा.कोसळला . यामुळे काही काळ देवगड निपाणी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
तातडीने असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी विज वितरण कंपनीचे अधिकारी श्री पंडित यांना दुरध्वनी व्दारे संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ लाईनमन यांना पाचारण करून विद्युत पुरवठा बंद केला व रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.

यावेळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांच्या सहीत सिमरन कांदळकर , सचिन कांदळकर, श्रीकृष्ण वायंगणकर ,सतिश पोकळे, मनोहर प्रभूखोत ,भाग्यश्री नरे, यासीर मास्के ,गवस ताबोंळी आदींनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 18 =