You are currently viewing बॅ. नाथ पै बी.एड महाविद्यालयात बी.एड प्रवेश पूर्व परीक्षा (बी.एड.सीईटी) अर्ज व मार्गदर्शनाची मोफत सुविधा..

बॅ. नाथ पै बी.एड महाविद्यालयात बी.एड प्रवेश पूर्व परीक्षा (बी.एड.सीईटी) अर्ज व मार्गदर्शनाची मोफत सुविधा..

सिंधुदुर्ग :

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित बॅरिस्टर नाथ पै बी. एड महाविद्यालयात बी. एड प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाची आवश्यक असलेली सीईटी (सामाईक प्रवेश परीक्षा) चे अर्ज मोफत भरण्याची सुविधा सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 11:00 ते 5:00 वाजेपर्यंत उपलब्ध करून दिली आहे तसेच रविवार दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 10.30 ते 01.30 वाजेपर्यंत सामायिक प्रवेश परीक्षेचे मोफत मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये परीक्षेची वेळ, प्रश्नाचे स्वरूप काठिण्य पातळी, परीक्षेची नियमावली तर इतर या संदर्भात मार्गदर्शन प्राध्यापकांकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बी.एड अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांनी महाविद्यालयातील खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रा. परेश धावडे – 9420822878
प्रा. नितीन बांबर्डेकर – 9423832705
प्रा. अरुण मर्गज – 9423302859
प्रा. अनुष्का रेवंडकर – 9422632021
प्रा. योगीता शिरसाट – 9404747563

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 3 =