You are currently viewing भाजप किसान मोर्चाने केला सामुदायिक शेतीचा प्रयोग

भाजप किसान मोर्चाने केला सामुदायिक शेतीचा प्रयोग

हडी येथे दोन एकर जागेत केली भात शेती

मालवण

मालवण तालुक्यातील हडी येथील गावकर कुटूंबियांची दोन एकर शेत जमीन भाडेतत्वावर घेऊन मालवण तालुका भाजप किसान मोर्चाच्यावतीने सामुदायिक शेतीचा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला या सामुदायिक शेतीसाठी ६४४४ नंबरचे एक काडी लावणी भात , ही लावणी श्री पद्धतीने १० इंच × १० इंच च्या रांगेत केली गेली ,

भारत हा शेती प्रधान देश आहे , त्यामुळे शेतकरी जगला तर देशाची अर्थव्यवस्था जगु शकते . म्हणुनच भाजपा च्या किसान मोर्चा ने पडीक जमीनी कराराने घेऊन त्यावर सामुदायिक शेतीचा प्रयोग करण्याचे ठरवले होते त्यानुसार हडी येथे हा प्रयोग करण्यात आला ही लावणी कृषी तज्ज्ञ कृषी अधिकारी यांच्या उपस्थित झाली

ही सामुदायिक शेती किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. उमेश सावंत , प्रगतशील शेतकरी व ओझर हायस्कूल चे चेअरमन व किसान मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर नरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली . यासाठी भाजपा किसान मोर्चा चे मालवण तालुकाध्यक्ष श्री . महेश सारंग , उपाध्यक्ष श्री. प्रसाद भोजने , सल्लागार श्री. हरिभाऊ केळुसकर , श्री. संजय मळेकर , या टीमने स्वतः ही सामुदायिक शेती गावातील शेतकऱ्यांच्या मदतीने करत आहेत . सध्या होत चाललेला शेतीकडचा दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर जास्तीतजास्त लोकांनी पुन्हा शेतीकडे वळावे म्हणून मालवण तालुका किसान मोर्चा हा प्रयत्न करत असल्याची माहिती किसान मोर्चा मालवण तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी दिली .

प्रतिक्रिया व्यक्त करा