You are currently viewing पुन्हा एकदा

पुन्हा एकदा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पुन्हा एकदा*

 

बालानंद वृत्त ८+६

 

वाटते पुन्हा दिन यावे

बालपणीच्या खेळांचे

सागरगोटे उडवावे

छापापाणी गमतीचे..

 

होता भरला नंद मनी

नव्हती चिंता ना असुया

सुंदर होते जग सारे

परत एकदा ते जगुया..

 

पक्षी गाती किलबिलती

चराचरी ते बागडती

सृष्टी सारी मोदभरी

आठवणी त्या गुणगुणती..

 

सुस्वर होती ती गाणी

आनंदवनी रमणारी

मनामनाशी जुळणारी

नाती होती टिकणारी..

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा