You are currently viewing जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पेन्शन अदालत

जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पेन्शन अदालत

सिंधुदुर्गनगरी

 जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन विषयक प्रकरणे व तद्अनुषंगीक  लाभांचा आढावा घेऊन सदर प्रकरणे निकाली काढण्यसाठी सन 2022-23 या वर्षी जिल्हास्तरीय पेन्शन अदालत कार्यक्रम  राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे.

            जिल्हास्तरीय तिमाही पेन्शन अदालत कार्यक्रम  पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार 28 जून 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजता. मंगळवार  18 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजता. शुक्रवार 20 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 ते 1.30 वाजता. आयोजित करण्यात आली आहे. तालुक्यास्तरीय तिमाही पेन्शन अदालत कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. माहे जून 2022  चौथ आठवडा. माहे ऑक्टोंबर 2022  दुसरा आठवडा व माहे जानेवारी 2023  दुसरा आठवडा असे आहेत. या सभेस सर्व खातेप्रमुख व गट विकास अधिकारी यांनी उपस्थित रहावे. पेन्शन अदालतीस सेवानिवृत्त वेतन प्रकरण अगर तद्अनुषंगीक लाभ देणे प्रलंबित असणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचारी अगर त्यांच्या प्राधिकृत  प्रतिनिधीचे उपस्थित रहावे.

            गट विकास अधिकारी यांनी ठरवून दिलेल्या आठवड्यात तारखा निश्चित करुन संबंधितांना कळवावे.  त्याबाबत अंमलबजावणी करुन निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतन व त्याअनुषंगाने लाभाच्या तक्रारीचे निराकरण करावे. या तालुकास्तरीय पेन्शन अदालतीस संबंधित तालुक्यातील सर्व कार्यालयप्रमुखांनी उपस्थित रहावयाचे आहे. तसेच सूचनाचे काटेकोर पालन करावयाचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =