You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयात दि.5 जुलै रोजी दुपारी 2 वाजता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व तलाठी भरती मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयात दि.5 जुलै रोजी दुपारी 2 वाजता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व तलाठी भरती मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.

सावंतवाडी

मल्टी स्किल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर सिंधुदुर्ग आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही अधिकारी होणारच ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व तलाठी भरती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन 5 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2 वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारकमंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले भुषविणार आहेत.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक प्रा. अमेय सुनील महाजन सहाय्यक प्राध्यापक व समन्वयक कीर्ती महाविद्यालय, मुंबई हे मार्गदर्शन करणार आहेत.तरी ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल व तलाठी परीक्षेसाठी प्रविष्ट व्हायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − sixteen =