You are currently viewing सिंधुनगरीतील दूरसंचार विभागाचे टॉवर आगीत जळून खाक

सिंधुनगरीतील दूरसंचार विभागाचे टॉवर आगीत जळून खाक

ओरोस :

 

रविवारी सायंकाळी सिंधुनगरीतील दूरसंचार विभागाच्या टॉवरला आगीने घेरल्यामुळे टॉवरवरील केबल व दूरसंचार विभागाच्या स्क्रॅप मटेरियल या आगीत जळून खाक झाले. ओरोस पोलीस ठाण्याला ही घटना समजतात तात्काळ कुडाळ एमआयडी चे अग्निशमन दल पोहचले व त्यामुळे दूरसंचार विभागाची फार मोठी हानी टळली.

प्रशासकीय संकुला नजीकच असलेला बीएसएनएल चा टॉवर व कार्यालयीन इमारत तसेच निवासस्थाने असून सध्या बीएसएनएल विभागाने ही मालमत्ता दुर्लक्षित केल्यामुळे वाढलेल्या गवतास रविवारी सायंकाळी 7.15 च्या दरम्याने लागलेली आग बीएसएनएलच्या टॉवर पर्यंत पोहोचली आणि या आगीने रौद्ररूप धारण केले. त्यानंतर 7.35 च्या दरम्यान कुडाळ एमआयडीसीचा बंब दाखल झाला व ही आग आटोक्यात आणली. त्यानंतर कुडाळ नगरपंचायतीचे अग्निशमन दल पोहचले.

कुडाळ एमआयडीसी अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर जे आर तडवी, के वाय साळुंखे, आर ए मर्ड, गुडेकर, पोटे व डिचवलकर या अधिकारी व अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे दूरसंचार विभागाचे फार मोठे आर्थिक नुकसान टळले. याआगीत बीएसएनएलच्या स्क्रॅप मटेरियल चे हे फार मोठे नुकसान झाले आहे.

काही दिवसापूर्वी सामाजिक वनीकरणच्या ताब्यात असलेल्या शासनाच्या जैवविविधता उद्यानाची अशीच राख रांगोळी आगीने केली होती. यावर झालेल्या कोट्यावधीचा खर्च तसेच अनेक नामवंत जातीच्या वृक्षांची राख रांगोळी झाली होती. या आगीची झळ लगतच असलेल्या स्मृती उद्यानालाही बसली होती. मात्र या आगीची कोणतीही चौकशी अथवा कोणतीही दखल त्या विभागाने न घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा