You are currently viewing तलावाकाठी लोखंडी रेलिंग बसवा….

तलावाकाठी लोखंडी रेलिंग बसवा….

राजू मसुरकर यांची मागणी

सावंतवाडी

येथील मोती तलावाच्या काठावर बसणाऱ्यांचा चक्कर येऊन किंवा तोल जाऊन तलावात पडण्याच्या घटना घडत असल्याने तलावाच्या संपूर्ण कठड्याला संरक्षक लोखंडी रेलिंग किंवा लोखंडी जाळी बसविण्याबाबत वारंवार मागणी करूनही नगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने तोल जाऊन तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू होणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना आपला माणूस गमवावा लागत आहे. यासाठी नगरपालिका प्रशासन व स्थानिक आमदारांनी लक्ष घालून नागरिकांच्या सुरक्षितेसाठी तलावाच्या (काठाला रेलिंग अथवा लोखंडी जाळी बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी मसुरकर यांनी केली आहे.

विरंगुळा म्हणून तलावाकाठी बसत असताना एखाद्यावेळी तोल जाऊन पडण्याची, वृद्ध व्यक्तीचा ब्लड प्रेशर कमी जास्त होऊन तोल जाण्याचे प्रकार घडण्याची शक्यता अधिक असते. गेल्या काही वर्षात तोल जाऊन तलावाच्या पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नगरपालिका, नगराध्यक्ष व प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परंतु अद्याप कोणीच दखल घेतलेली नाही. त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. याला जबाबदार नगरपालिका प्रशासन आहे.

ज्याप्रमाणे तलावाच्या श्रीराम वाचन मंदिरसमोरील सेल्फी पॉईंटवर लोखंडी रेलिंग बसविण्यात आले, तसे संपूर्ण तलावाकाठी बसवाने, संपर्ण अशी मागणी मसुरकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =