You are currently viewing सिंधुदुर्ग कन्येचा छत्तीसगडमध्ये झेंडा!

सिंधुदुर्ग कन्येचा छत्तीसगडमध्ये झेंडा!

कासार्डेच्या डाॅ.प्रियांका पाताडे ‘नॅशनल बेस्ट टिचर आॅवार्डने सन्मानित….

कासार्डे: दत्तात्रय मारकड

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हैदराबाद या संस्थेमार्फत प्रतिवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा” नॅशनल बेस्ट टिचर अवॉर्ड” कणकवली तालुक्यातील कासार्डे गावची कन्या डॉ. प्रियांका सुभाष पाताडे यांना यावर्षी मिळाला असून बिलासपूर येथील नामांकित काॅलेज मध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या या मराठी मुलीने सिंधुदुर्गाचा झेंडा राष्ट्रीय आॅवार्डाच्या रुपाने छत्तीसगड राज्यात फडकवला आहे.
डॉ. प्रियंका पाताडे या छत्तीसगड येथील बिलासपुर शहरात “करिअर पॉईंट वर्ड स्कूल व काॅलेजमध्ये विज्ञान विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका म्हणून गेल्या ६ वर्षापासुन कार्यरत आहेत.
डॉ.प्रियांका पाताडे या कासार्डेतील सामाजिक कार्यकर्त्या व माजी जि.प.सदस्या सौ.सुप्रिया पाताडे व कासार्डे माध्यमिक विद्यालयचे माजी वरिष्ठ लिपिक तथा सिलीका माईन्स उद्योगजक सुभाष पाताडे यांची कन्या आहे.
डॉ.प्रियांका पाताडे यांची शालेय शिक्षण कासार्डे बंडवाडी व कासार्डे माध्यमिक विद्यालयात मराठी माध्यमातुन झाले आहे. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र या विषयात पीएचडी केली आहे. ‘त्या’ कासार्डे दशक्रोशित पीएचडी करणा-या पहिल्या विद्यार्थिनी ठरल्या होत्या.
तसेच १५ वर्षापासून मेडिकल (Neet) प्रवेश परीक्षेचे राजस्थान कोटाच्या सीबीईसी एज्युकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘त्या’ विशेष मार्गदर्शन करीत आहेत. संशोधन दरम्यान त्यांनी आयआयटी पवईमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी आकाश संस्था दिल्ली, राव आयआयटी संस्था कोटा मध्येही प्राध्यापिका म्हणून मार्गदर्शन केले आहे.
डाॅ.प्रियांका पाताडे यांच्या उत्कृष्ट संशोधनाला यापूर्वी ही सन.२०१० साली ” बेस्ट युवा राष्ट्रीय संशोधक” म्हणून आॅवार्ड मिळाला आहे.
तर त्यांना आत्तापर्यंत त्यांना संशोधनासाठी ४ राष्ट्रीय आॅवार्ड तर शिक्षकी पेशातून एक राष्ट्रीय आॅवार्ड प्राप्त झाला आहे.

झेडपीच्या शाळेतुन शिक्षण घेऊनही यशाचे उंच शिखर गाठता येते
-डाॅ.प्रियांका पाताडे

आपण झेडपीच्या मराठी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेतले तरीही मेहनते यशाचे कोणतेही उंच शिखर गाठता येते,आई वडिलांनी घेतलेल्या परिश्रमाचे संस्काराचे हे फळ आहे,अशी प्रतिक्रिया डॉ. प्रियांका पाताडे यांनी संवादशी बोलताना व्यक्त केली.
त्यांच्या या यशाबद्दल स्कूल मॅनेजमेंटचे संचालक सुरेंद्रसिंग चावला, चेअरमन किरणपालसिंग चावला, प्रिन्सिपल आणि सर्व स्टाफ आणि तसेच कासार्डे परिसर बरोबरच सर्वस्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 7 =