You are currently viewing फेसबुकद्वारे दोडामार्ग नगरपंचायतची बदनामी

फेसबुकद्वारे दोडामार्ग नगरपंचायतची बदनामी

नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांची पोलिसांत तक्रार

दोडामार्ग

दोडामार्ग नगरपंचायतची फेसबुकवर बदनामकारक पोस्ट टाकल्या प्रकरणी नगरपंचयातचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेवक आदींनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शहरातील सावंतवाडा येथील पांडुरंग मधुकर खांबल यांच्या विरुद्ध ही तक्रार असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दोडामार्ग शहरातील बाजारपेठेमधील पिंपळेश्वर देवस्थानानजिकची मोरी मातीने माखली असून त्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबते आहे. या संदर्भातील एक पोस्ट पांडुरंग मधुकर खांबल याने ‘लाखो रुपये खर्च करून बांधला गटार तरीपण पाणी तुंबते…. भ्रष्टाचार पाण्यावर तरंगत आहे’ या शिर्षकाखाली फेसबुकवर टाकली. त्यामुळे नगरपंचायतची नाहक बदनामी खांबल याने केली आहे असे नगरपंचायतकडून आज स्पष्ट करण्यात आले.दोडामार्ग ते आयी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीत येत असून या रस्त्याचे बांधकाम, दुरुस्ती, आवश्यक जागी मोऱ्या बसविणे व पावसाळ्यापूर्वी साफ करणे वैगरे कामे ही बांधकाम विभागामार्फतच होत असतात त्यामध्ये नगरपंचायतचा कोणताही संबंध येत नाही तसेच अशा प्रकारच्या कामासाठी नगरपंचायतकडून कोणताही खर्च करण्यात आलेला नाही मात्र तरीही पांडुरंग खांबल याने फेसबुकवर पोस्ट टाकून कसई – दोडामार्ग नगरपंचयातची नाहक बदनामी केली व नागरिकांची दिशाभूल केली आहे. ते लक्षत घेता या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याची मागणी यावेळी पोलिसांकडे करण्यात आली आहे. या निवेदनावर नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती यांच्या सह्या देखील आहेत. तसेच निवेदन देतेवेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, स्वीकृत नगरसेवक डॉ. संजय खडपकर, माजी नगरसेवक सुधीर पनवेलकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 2 =