You are currently viewing हिमानी परब हिचा आमदार वैभव नाईक यांनी केला सत्कार

हिमानी परब हिचा आमदार वैभव नाईक यांनी केला सत्कार

कुडाळ तालुक्यातील कसाल वज्रेवाडी येथील सिंधुकन्या मल्लखांब खेळाडू कु. हिमानी उत्तम परब हिला संपुर्ण भारतामधून सर्वोत्कृष्ट क्रीडापटूसाठी दिला जाणाऱ्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज कसाल हायस्कूल येथे तिचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी हिमानी परब हिला शाल श्रीफळ देऊन पुष्पहार घालून तिचा सत्कार केला.
यावेळी माजी विभाग प्रमुख बाळा कांदळकर, अवधूत मालणकर, आशिष परब, हेदुळ सरपंच नंदू गावडे, बिभीषण पाटील, देशपांडे सर, अमित मर्तल अरुण राणे, डॉ.बालम, कसाल शिक्षण संस्था सदस्य, रोटरी क्लब सदस्य, कसाल विकास सोसायटी सदस्य, दशक्रोशीतील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा