You are currently viewing शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

मुंबई

मुंबई विद्यापीठाचे श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र ,सार्थ प्रतिष्ठान व न्युज फोटोग्राफरर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दिक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे ,सौ.रश्मी ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी खासदार राहुल शेवाळे,खासदार विनायक राऊत,खासदार राजन विचारे त्यांच्या समवेत होते.या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर, सिनेट सदस्य मा.प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, निखिल जाधव, शीतल सेठ देवरुखकर, तसेच फोटोग्राफर्स असो. अरुण पाटील, रजनीश काकडे,(सचिव), सतिश माळवदे (अध्यक्ष) यांनी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक दत्ता घाटकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा