You are currently viewing उद्या होणाऱ्या पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेसाठीच्या जर्सीचे झाले अनावरण.!

उद्या होणाऱ्या पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेसाठीच्या जर्सीचे झाले अनावरण.!

उद्या होणाऱ्या पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेसाठीच्या जर्सीचे झाले अनावरण.!

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुका पत्रकार संघ (संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ) यांच्या वतीने उद्या जिल्हास्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर चषक क्रिकेट स्पर्धा – २०२४ सावंतवाडी येथे जिमखाना मैदानावर संपन्न होणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंसाठी उपलब्ध झालेल्या जर्सीचे अनावरण आज सावंतवाडी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर अर्चना फाउंडेशन अध्यक्ष सौ. अर्चना घारे – परब यांनी प्रायोजित केले असून खेळाडूंसाठी टोपी दत्तगुरु डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर उदय भोसले यांनी प्रायोजित केले आहेत.

दरम्यान या जर्सीच्या अनावरण प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, जिल्हा खजिनदार ॲड. संतोष सावंत, तालुका पत्रकार संघाचे सचिव मयूर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक गावकर, माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, सचिन रेडकर, पत्रकार शिवप्रसाद देसाई, नरेंद्र देशपांडे, प्रा. रुपेश पाटील,ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, उमेश सावंत, जय भोसले, हर्षवर्धन धारणकर, संतोष परब, राजेश नाईक, शेलेश मयेकर, निखिल माळकर व अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − 2 =