सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलज. आंबोली ची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
आंबोली प्रतिनिधी :
आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेने सलग १८ व्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून २८ विद्यार्थ्याना विशेष श्रेणीत तर उर्वरीत सर्व २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीण झाले आहेत.
यामध्ये शाळेमधून कॅडेट- वेदांत दिपक महाडीक ९४२० व कॅडेट पार्थ निलेश सांडव ९४ . २० गुण मिळवून प्रथम क्रमांक व कॅडेट जगन्मय कमलेश कांबळी याने ९४.०० टक्के गुण मिळवून व्दितीय तर कॅडेट सतेज नानराण पाटील याने ९२.२० टक्के गुण मिळवून तृतीय कमांक व कॅडेट – ओंकार नामदेव धुरी याने ९१.०० टक्के गुण मिळवीले आहेत. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी NDA लेखी परिक्षेत तसेच JEE CET, NEET परीक्षेत यश प्राप्त केले आहे.शाळेचे अनेक विद्यार्थी आर्मी नेवी मर्चंट नेवी बहुराष्ट्रीय कंपनी आदी क्षेत्रात अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. शाळेत निवासी सैन्य प्रशिक्षण कवायत युद्ध कौशल्य आत्मसंरक्षण विविध साहसी खेळ व स्पर्धात्मक परीक्षांचे मागर्दशन केले जाते. १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखल्या बाबत संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनिल राऊळ व सचिव श्री जॉय डॉन्टस तसेच संचालक श्री. शंकर गावड़े श्री.शिवाजी परब व सर्व संचालक कार्यालयीन सचिव श्री. दिपक राऊळ सैनिक स्कूलचे प्राचार्य श्री नितीन गावडे व वर्गशिक्षक श्री . मायाप्पा शिंदे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
