You are currently viewing सामाजिक उपक्रम राबवत शहर भाजप कडून आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा

सामाजिक उपक्रम राबवत शहर भाजप कडून आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा

सावंतवाडी

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहर भाजप कडून आज सावंतवाडी नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्याना छत्री वाटप करण्यात आले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत विविध उपक्रम राबवत आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस शहर भाजप कडून उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, आनंद नेवगी, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील राऊळ, जिल्हा बँक संचालक रवी मडगांवकर, सरचिटणीस विनोद सावंत, शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर, सोशल” मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, युवा अध्यक्ष संदेश टेंबकर, अमित परब, संजय वरेरकर, सुनील सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा