कबुलायतदार गावकर प्रश्र लवकरात लवकर सोडविण्याचे प्रयत्न करू; उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासान
सावंतवाडी :
आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे नेतृत्व करणारे शिंदे शिवसेनेचे नेते दिनेश गावडे यांनी काल काड सिध्देश्वर मठात राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदें यांनी चौकुळ गावचा कबुलायतदार गावकर प्रश्न लवकरच निकाली निघेल असे आश्वासन दिले.
आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघात गेली पंधरा वर्षे सामाजिक व सांस्कृतिक काम करीत असलेले शिंदे शिवसेनेचे शिलेदार, दिनेश गावडे यांनी आंबोली चौकुळ गावच्या विविध प्रश्रासंबंधी उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे कोल्हापूर कणेरी मठात भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक आमदार दिपक केसरकर यांच्याशी चर्चा करून हा प्रश्र लवकरात लवकर निकाल लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी ऋषीकेश पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.