You are currently viewing मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु

इयत्ता ८ वी ते १२ वी विद्यार्थ्यांना मोफत निवासभोजन व विविध सुविधा

सिंधुदुर्गनगरी

 सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणसिंधुदुर्ग यांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी रिक्त जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू करण्यात आली असूनइच्छुक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अर्ज करावेतअसे आवाहन सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

            जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण/ कणकवली/ वेंगुर्ला अशा 3 ठिकाणी तसेच मुलींचे शासकीय वसतिगृह मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला, देवगड अशा 5 ठिकाणी आहेत. या 8 शासकीय वसतिगृहांमध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विद्यार्थ्यी, विद्यार्थ्यीनींना सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी  या पोर्टलवर मोफत ऑनलाईन प्रवेशासी संधी उपलब्ध होणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी नजिकच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशाची नोंदणी करण्यात यावी.

             या वसतिगृहांमध्ये इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वीचे प्रवेश सुरु होणार आहेत. या शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम, व इंटरनेट वाय-फाय, आदी सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येतात. या वसतिगृहातील गृहपाल, अधिक्षीका व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग (02362228882) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त, संतोष चिकणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा