You are currently viewing क्षयरोग व कुष्ठरोग सर्वे करण्यास कुडाळ तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांचा नकार

क्षयरोग व कुष्ठरोग सर्वे करण्यास कुडाळ तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांचा नकार

मानधनात अनिश्चितता असल्याने निर्णय

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा वर्कर्स व आशा गट प्रवर्तक कोरोना काळात घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या आरोग्याची माहिती संकलित करत आहेत.हे काम सुरू असतानाच शासनाने आता क्षयरोग व कुष्ठरोग सर्व्हेही आशांनीच करावा असे आदेश काढले आहेत.मात्र या सर्व्हेच्या मानधनात अनिश्चितता असल्याने हा सर्व्हे करण्यास कुडाळ तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी याना सादर केले आहे.

गेल्यावर्षीही या कामासाठी तुटपुंजे मानधन देण्यात आले होते.त्यावेळी मानधनात वाढ करण्याची मागणी करण्यात होती,परंतु पुढील वर्षी समाधानकारक मानधन दिले जाईल असे आश्वसन शासनाने दिले होते.त्यामुळेच यावेळेस तरी मानधनात वाढ करावी अशी मागणी आशा सेविकांनी केली आहे.मात्र यावेळीही मानधन वाढीबाबत शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + fourteen =