You are currently viewing लाकडी खेळण्याचे प्रसिध्द व्यापारी शशिकांत नारायण काणेकर निधन

लाकडी खेळण्याचे प्रसिध्द व्यापारी शशिकांत नारायण काणेकर निधन

सावंतवाडी :

 

सावंतवाडी शहरातील गांधी चौक येथील लाकडी खेळण्याचे प्रसिध्द व्यापारी शशिकांत नारायण काणेकर यांचे रविवारी सायंकाळी उशिरा निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. पाच दशकाहून अधिक काळ त्यांनी लाकडी खेळण्याच्या व्यवसायात कार्यरत राहून या खेळण्याच्या प्रसार व प्रचारात महत्वाचे योगदान दिले. गांधी चौक येथे त्यांचे पी. डी. काणेकर लाकडी खेळणी दुकान आहे. रविवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, भाऊ, सुना, भावजय, पुतणे, नातवंडे जावई असा परिवार आहे. येथील लाकडी खेळण्याचे व्यापारी विनय आणि राजेश काणेकर यांचे ते वडील तर कै. भाई काणेकर यांचे ते भाऊ होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + thirteen =