You are currently viewing सावंतवाडी पोस्ट ऑफिस संजु विर्नोडकर टिमने केले निर्जतुकीकरण..

सावंतवाडी पोस्ट ऑफिस संजु विर्नोडकर टिमने केले निर्जतुकीकरण..

सावंतवाडी
शहरातील पोस्ट आँफिसचे कर्मचारी कोरोना बाधित आढल्याने संबधित खात्याच्या कर्मचारी व रोजच्या व्यवहारात असणारे एजंट यांच्यात घबराटिचे वातावरण निर्माण झाले. पोस्ट डे ला सामाजिक कार्यकर्ते संजू विर्नोडकर यांच्या टिमने हे आँफिस निर्जतुकीकरण केले होते.

त्यावेळचे कार्य पाहुन पोस्टाचे अधिकारी श्री. गोसावी यांनी संजु विरनोडकर यांच्याशी संपर्क केला व त्वरीत विरनोडकर टिमचे संतोष तळवणेकर, पोस्ट एजंट मोहिनी मडगावर, राजवी विरनोडकर, तुषार बांदेकर यानी संपुर्ण पोस्ट आँफिस, स्वच्छतागृह, एटीएम, ग्राहकांचे बसण्याचे बेंच, कर्मचार्‍यांची वहाने, रस्ता, ईमारत व त्यातली दूकाने निर्जतुकीकरण केले. या टिमचे पोस्ट आँफिस कर्मचारी वर्गाने प्रशंसा करुन आभार मानले!

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − thirteen =