You are currently viewing आंतरराष्ट्रीय योग दिन अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे महाविद्यालयात उत्साहात साजरा

आंतरराष्ट्रीय योग दिन अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे महाविद्यालयात उत्साहात साजरा

*जयेंद्र रावराणे सेमी इंग्लिश व किलबिल स्कूल च्या विद्यार्थ्यांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद*

 

वैभववाडी / प्रतिनिधी :

 

आज २१ जून सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय तसेच जयेंद्र रावराणे सेमी इंग्लिश व किलबिल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रशालेच्या पटांगणावर योग दिन उत्साहात संपन्न झाला. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला योग दिन व योगा चे मानवी जीवनातील महत्व याबाबत क्रिडा शिक्षक तुळसणकर एस टी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यानंतर प्रशालेचे शिक्षक शिंदे एस. बी., मरळकर व्हि. एस., तुळसणकर एस टी यांनी योगाचे विविध प्रकार विद्यार्थ्यांच्या समोर सादर केले.

विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वांनी सांघिक योग प्रकारांची प्रात्यक्षिके सादर करत विद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. विशेष म्हणजे जयेंद्र रावराणे सेमी इंग्लिश व किलबिल स्कूल ची छोटी मुले देखील या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर बी.एस., पाटील पी.एम., शिंदे एस. बी,सावंत पी.जे., श्रीम.पाटील एस.एस, सांस्कृतिक विभाग प्रमुख चोरगे एम. एस, चव्हाण वाय. जी.,क्रिडा शिक्षक तुळसणकर एस, टी, मरळकर व्हि.एस, पवार पी.बी. प्रशालेच्या सर्व विभागांचे शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × five =