You are currently viewing मुंबई मधील गेट वे ऑफ इंडिया तसेच मलबार हिल प्रमाणे सिंधुदुर्ग च्या किनारपट्टीवर टुरिझम पोलीसची नियुक्ती करावी

मुंबई मधील गेट वे ऑफ इंडिया तसेच मलबार हिल प्रमाणे सिंधुदुर्ग च्या किनारपट्टीवर टुरिझम पोलीसची नियुक्ती करावी

विष्णू मोंडकर, जिल्हाध्यक्ष पर्यटन व्यवसायिक महासंघ

महासंघाची पर्यटन महासंचालक श्री धनंजय सावळकर यांच्या कडे मागणी

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा महाराष्ट्र शासनाकडून घोषित होऊनही गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी तसेच येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेतेसाठी कुठलीही सक्षम यंत्रणा राज्य सरकारने आज पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हात उभारलेली नाही .प्रशासन कर रूपात पर्यटन व्यावसायिकाकडून पैसे जमा करत आहे आणि पर्यटकांची सुरक्षा जिल्ह्यातील स्थानिकांच्या वर प्रशासन निद्रिस्त अवस्थेत आपला कारभार हाताळत आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या टुरिझम पोलीस पॉलिसी प्रमाणे देशातील राज्यात टुरिजम पोलीस ही संकल्पना राबविली जात असून आंध्रप्रदेश ,गोवा,कर्नाटक,केरळ,जम्मू काश्मिर ,दिल्ली इत्यादी 14 राज्याच्या समावेश असून आपल्या महाराष्ट्र राज्याचा समावेश टुरिझम पोलीस पॉलिसी मध्ये आहे त्याप्रमाणे मुबई येथे गेट वे ऑफ इंडिया व मलबार हिल येथे टुरिझम पोलीस नेमणूक झाली आहे यांचा मुख्य उद्धेश पर्यटकांची रक्षा आणि सुरक्षा तसेच अनधिकृत पर्यटन ,जलक्रीडा व्यवसाय कार्यवाही तसेच स्थानिक पर्यटन व्यावसायिक,पर्यटन विषयि काम करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून पर्यटकांस सुविधा देणे हा असून
सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर टुरिझम पोलीस नियुक्ती झाल्यास किनापट्टीवर जल पर्यटनासाठी येणाऱ्या लाखो पर्यटकांचे सुसूत्र नियोजनासाठी मदत होईल अशी मागणी जिल्हाध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने श्री धनंजय सावळकर महासंचालक ,पर्यटन महाराष्ट्र यांच्या कडे केली आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + thirteen =