You are currently viewing मळगाव इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा

मळगाव इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा

सावंतवाडी

उन्हाळी सुट्टीनंतर शाळांची घंटा वाजली आणि दीड महिन्याने मुलांचे शाळेत प्रथमच आगमन झाले. यावेळी पाचवी व आठवीत नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करून प्रशालेच्या सर्व महिला शिक्षिकांनी औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुस्तंकाचे वितरण करण्यात आले.त्याचबरोबर सर्व पालकांचेही गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय खेळाडू साहिश तळणकर याने रायफल शुटिंगमध्ये रौप्यपदक प्राप्त केल्याने पाहुण्यांच्यां उपस्थितीत त्याचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांनी मुलांना शुभेच्छा देऊन मार्गदशन केले. या कार्यक्रमातला स्कूल कमिटी चेअरमन मा.मनोहर राऊळ, संस्था संचालक मा. रामचंद्र केळुसकर,स्कूल कमिटी सदस्य मा.दिपक जोशी, मा.चंद्रकांत जाधव, मा.मुख्याध्यापिका सौ.श्रद्धा सावंत ,पर्यवेक्षक श्री.फाले सर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.मातोंडकर मॅडमनी केले. व आभार फाले सर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा