You are currently viewing यंदा तरी चाकरमान्यांना विमान प्रवास घडू दे!

यंदा तरी चाकरमान्यांना विमान प्रवास घडू दे!

परुळे :

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पा पावू दे आणि सिंधुदुर्गातील चाकरमान्यांना विमान प्रवास घडू दे अशी अपेक्षा जिल्हावासीय व्यक्त करीत आहेत.

गणेश चतुर्थी जवळ आली की परुळे चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ सुरू होणार अशा घोषणा गेली तीन वर्षे होत आहे सिंधुदुर्ग वासियांचे प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार असे वाटत असताना कोणते ना कोणते विघ्न येते आणि एक वर्ष चर्चा थांबते मात्र आता डीजीसीए विमानतळाच्या कामावर समाधानी आहे.

नुकतीच पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या डीजीसीए ने धावपट्टी बाबत समाधान व्यक्त केले आहे मात्र डीजीसीए ने वीज ,पाणी ,रस्ता व इंटरनेटचे कागदोपत्री पाहणी केली आहे की, ग्राउंड लेव्हलवर जाऊन पाहणी केली आहे ,असाही प्रश्न निर्माण होतो तरी सुद्धा डीजीसीएकडून विमानतळाला परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे काही दिवसापूर्वी झालेली पाहणी दौऱ्यानंतर स्पष्ट झालेल आहे.

खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांनी गेले काही महिने विमानतळ सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न चालविले आहे केंद्रीय समितीचा दौरा घडवून त्याचे समर्थन मिळवण्यात येईल यश मिळवले आहे.

परुळे चिपी विमानतळ याची मुहूर्तमेढ तत्कालीन खासदार सुधीर सावंत यांनी रोवली. दिल्लीतून नॅशनल एअरपोर्ट आणून प्रथम म्हापण कातळावर सर्वे केला.मात्र तेथे विरोध केल्याने परुळे येथे सर्वे करून जागा निश्चित करण्यात आली राज्यात सेना-भाजपची सत्ता असताना विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 − 1 =