You are currently viewing उमेद फाऊंडेशन मार्फत कासार्डे विद्यालयात दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप

उमेद फाऊंडेशन मार्फत कासार्डे विद्यालयात दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप

तळेरे : प्रतिनिधी

कासार्डे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना उमेद फाऊंडेशन मार्फत दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप विद्यालयाचे प्राचार्य एम.डी. खाड्ये, उमेदीयन- सुहास पाताडे,पर्यवेक्षक नारायण कुचेकर,उमेदीयन- जाकीर शेख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या वितरण प्रसंगी कासार्डे माध्यमिक विद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी ही उपस्थित होते.
याप्रसंगी उमेदीयन सुहास पाताडे व जाकीर शेख यांनी उमेद फाऊंडेशनच्या कार्याचा सविस्तर आढावा घेताना उमेद फाऊंडेशन ही गरीब, निराधार आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात आणि मायेची उब देणारी संस्था असल्याचे सांगितले.
तसेच त्यांनी लोकवर्गणीतून चालेलल्या या उपक्रमात सहभागी होण्याचेही आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पर्यवेक्षक नारायण कुचेकर यांनी मानले..

कासार्डे : उमेद फाऊंडेशन मार्फत दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करताना प्राचार्य खाड्ये, पर्यवेक्षक नारायण कुचेकर व उमेदीयन सुहास पाताडे व जाकिर शेख आणि शिक्षकवृंद

प्रतिक्रिया व्यक्त करा