You are currently viewing वैभववाडी तालुक्यातील खरेदी विक्री संघाचे आज पुरस्कार जाहीर 

वैभववाडी तालुक्यातील खरेदी विक्री संघाचे आज पुरस्कार जाहीर 

चेअरमन महेश संसारे यांच्या द्वारे नावे घोषित तर पुरस्कारांचे वितरण येत्या २८ सप्टेंबरला

 

वैभववाडी :

 

वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी खरेदी विक्री संघाचे आज पुरस्कार जाहीर झाले असून तालुक्यातील पाच शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. आज पत्रकार परिषदेत संघाचे चेअरमन महेश संसारे यांनी या नावांची घोषणा केली. तालुका संघाकडून गेल्यावर्षी पासून शेतकऱ्यांना पुरस्कार दिले जात आहे. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी पाच शेतकरी निवडण्यात आले. श्री. संसारे यांनी आज शेतकऱ्यांची नावे जाहीर केली.

त्यानुसार त्यांनी उत्कृष्ट भातपिक शेतकरी पुरस्कार मनोहर पांडुरंग खरात (मांगवली), उत्कृष्ट काजु उत्पादक म्हणुन रामचंद्र बाळकृष्ण फोंडके (हेत), उत्कृष्ट ऊस उत्पादक शेतकरी म्हणुन प्रकाश रामचंद्र पालकर (सोनाळी), प्रयोगशील शेतकरी म्हणुन रमेश श्रीपत चव्हाण (कुंभवडे) आणि उत्कृष्ट पशुपालक म्हणुन सचिन विजय कोलते (करूळ) यांना जाहीर करण्यात आले आहेत. या निवडी निवड समितीने केल्या आहेत.

गेल्या काही वर्षापासुन संघाने शेती आणि शेतीपुरक व्यवसायात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतुने हे पुरस्कार सुरू केले आहेत. या पुरस्कारांचे वितरण येत्या २८ सप्टेंबरला संघाच्या सर्वसाधारण सभेत करण्यात येणार असल्याचे श्री.संसारे यांनी स्पष्ट केले. यावेळी उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, संचालक तथा बँकेचे माजी संचालक दिगबंर पाटील, सचिव सिध्देश रावराणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 11 =