You are currently viewing जिल्हा शल्य चिकित्सकांकडून देवगडातील लोकांची फसवणूक

जिल्हा शल्य चिकित्सकांकडून देवगडातील लोकांची फसवणूक

जिल्हा शल्य चिकित्सकांकडून देवगडातील लोकांची फसवणूक

युवासेनेसह काँग्रेसचा आरोप; सोमवार पासून करणार आमरण उपोषण

देवगड

येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरळीत आहे, रिक्त पदे भरली आहेत, असे खोटे सांगून खुद्द जिल्हा शल्य चिकित्सकांकडून देवगडातील जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप ठाकरे शिवसेनेचे युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी यांनी केला आहे. दरम्यान अनेक पदे रिक्त असल्याने त्या ठिकाणी रुग्णांना चांगली सेवा मिळत नाही. त्यामुळे तात्काळ रिक्त पदांची भरती करावी, अन्यथा सोमवारपासून रुग्णालयासमोर आमरण उपोषण करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.

यात असे नमूद केले आहे की देवगड ग्रामीण रुग्णलयामध्ये अधिकारी कर्मचारी नसल्याने सर्वसामान्य रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. या आरोग्य यंत्रणेकडे लोकप्रतिनिधी गांभीर्याने पाहणे आवश्यक असून गुरुवारी सायंकाळी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली असता एकमेव अधिपरिचरिका एका वर्षाकरिता कॉन्ट्रॅक्ट बेस वर आली असून रिक्त पदांचा घोळ हा गेली ६ ते ७ वर्षे असाच चालू असल्याने नागरिकांची दिशाभूल करून प्रसार माध्यमातून चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करून श्रेय घेणे म्हणजे जनतेच्या जीवाशी खेळणे आहे. असा सवाल सर्वसामान्य रुग्णांमधून उपस्थित केला जात आहे. सध्या देवगड तालुक्यात तापसरणीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून यावर ग्रामीण रुग्णालयात कुठल्याही प्रकारचे योग्य उपचार न केल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना अखेर खाजगी रुग्णालयात जावे लागते खाजगी रुग्णालयात उपचार घेणे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसून यामध्ये सर्वसामान्य रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. असे या निवेदनात नमूद केले आहे.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 1 =