You are currently viewing अतुल काळसेकर यांची भाजपा ‘लोकसभा प्रवास योजना’ अभियान संयोजकपदी नियुक्ती

अतुल काळसेकर यांची भाजपा ‘लोकसभा प्रवास योजना’ अभियान संयोजकपदी नियुक्ती

आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत संपूर्ण मतदार संघातील पक्षीय संयोजनाची जबाबदारी

 

भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष, विद्यमान प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. अतुल काळसेकर यांची लोकसभा प्रवास योजनेच्या संयोजकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

भाजपा पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकसभेच्या काही मतदारसंघात संघटन बांधणी जोमाने सुरू करण्याचे नियोजन केलेले आहे. येत्या १८ महिन्याच्या कालावधीत संबंधित लोकसभा मतदारसंघ आणि त्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ जिकण्याची तयारी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मा. अतुल काळसेकर हे संयोजक म्हणून कामाचे नियोजन करतील तर आमदार आशिष शेलार हे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.

या कालावधीत सदरचा मतदारसंघ जिंकण्यासाठी आवश्यक अश्या रचना, बूथ सशक्तीकरण आणि संपूर्ण मतदारसंघाचा नियमित प्रवास होऊन संघटन बांधणी मजबूत केली जाणार आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीत राष्ट्रीय सरचिटणीस मा विनोदजी तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या, दोन टर्म जिल्ह्याची जबाबदारी पेललेल्या संघटनकुशल अतुल काळसेकर यांनी यापूर्वी संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्याना न्याय दिलेला आहे.तो त्यांचा हातखंडा आहे. सद्या त्यांच्याकडे प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य ही जबाबदारी आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे ते उपाध्यक्ष आहेत.

त्यांच्या नियुक्तीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी येथील संघटनात्मक काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी मंडळीना एक वेगळा हुरूप मिळाला आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले की ही जबाबदारी ‘मिरविण्यासाठी’ ची नसून विरोधकांची ‘जिरविण्यासाठी’ ची आहे. मा. नारायणराव राणे, मा. रविंद्र चव्हाण, आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील सर्व जिल्हाध्यक्ष, आमदार, सर्व नेते, आणि माझे संघटन सहकारी यांना सोबत घेऊन राष्ट्रीय नेतृत्वाला अपेक्षित काम करण्याचा प्रयत्न राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + nineteen =