You are currently viewing सावंतवाडी व शिरोडा येथे शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांसाठी बंद बसफेऱ्या सुरू करा – हेमंत मराठे

सावंतवाडी व शिरोडा येथे शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांसाठी बंद बसफेऱ्या सुरू करा – हेमंत मराठे

सावंतवाडी व वेंगुर्ले बस स्थानकाच्या आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे मागणी…

सावंतवाडी

शाळा-कॉलेज सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर सातार्डा-शिरोडा, सावंतवाडी-शिरोडा व किनळे-सावंतवाडी या बसफेऱ्या तात्काळ सुरू करा, अशी मागणी मळेवाड-कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात त्यांनी सावंतवाडी व वेंगुर्ले आगाराच्या प्रमुखांना निवेदन दिले. याबाबतची माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, सोमवारपासून शाळा कॉलेज सुरू होत आहेत. कोरोना कालावधीत व त्या नंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे काही बसणाऱ्या एसटी प्रशासनाकडून बंद करण्यात आल्या होत्या. त्यातील काही बस फेऱ्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. आता पुढील दोन-चार दिवसात शाळा व विद्यालये सुरू होत आहेत. त्यामुळे शिरोडा व सावंतवाडी येथील शाळा विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी सातार्डा-मळेवाड मार्गे शिरोडा बसफेरी सुरू करा, तसेच किनळे सावंतवाडी व सावंतवाडी शिरोडा या सकाळच्या बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी श्री.मराठे यांनी वेंगुर्ले व सावंतवाडी बस स्थानकाच्या आगार प्रमुखांकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा