You are currently viewing होडावडा सोसायटी अध्यक्षपदी मनिष दळवी तर उपाध्यक्षपदी नारायण पार्सेकर बिनविरोध

होडावडा सोसायटी अध्यक्षपदी मनिष दळवी तर उपाध्यक्षपदी नारायण पार्सेकर बिनविरोध

वेंगुर्ले

तालुक्यातील श्री क्षेत्र पालेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी मनीष दळवी तर उपाध्यक्षपदी नारायण पार्सेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दि. २१ मे रोजी झालेल्या होडावडा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये श्री क्षेत्र पालेश्वर सहकार पॅनेलने विरोधी पॅनलचा १३-० असा पराभव करून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली एक हाती विजय मिळवत सलग तिसऱ्या वेळी संस्थेवर आपली सत्ता स्थापन केली होती. यानंतर दि. ११ जून रोजी संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला यादव यांच्या मार्फत पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी मनिष प्रकाश दळवी यांनी अध्यक्षपदासाठी व उपाध्यक्षपदासाठी नारायण लाडू पार्सेकर हे दोनच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी मावळते अध्यक्ष दिगंबर दळवी व उपाध्यक्ष मनोहर नाईक, माजी माजी सरपंच कुंदा पै, देऊ लाडू दळवी यांनी त्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी गुरुनाथ दळवी, तारामती सातार्डेकर, विलासिनी दळवी, विजय होडावडेकर, अनंत गोसावी, आनंद करंगुटकर, मानसी सातार्डेकर, राजन सावंत, प्रताप दळवी रामकृष्ण बावकर, कल्याण सावंत, अर्जुन दळवी, आपा पटेल, पराग सावंत, काका सावंत, प्रसाद परब आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष मनिष दळवी म्हणाले की, आपली संस्था जिल्ह्यात आदर्श संस्था म्हणून नावारूपास आणण्यासाठी सर्व नवनिर्वाचित संचालक व गावातील सर्वांचे सहकार्य घेऊन प्रयत्न करणार आहे. विकास संस्थेच्या माध्यमातून पथदर्शी उपक्रम राबविण्यासाठी कृषी व सहकार क्षेत्रातील तज्ञ मंडळींचे सहकार्य घेऊन विकास संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांसाठी त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शेती व शेतीपूरक व्यवसाय उभे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांची शेतकऱ्यांसाठी असलेली शेती संस्था म्हणून काम करत असताना सामान्य शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील असे मतही श्री दळवी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव राजबा सावंत यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा