You are currently viewing कळसुली गावातील वीज समस्या मार्गी लावा

कळसुली गावातील वीज समस्या मार्गी लावा

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस यांची महावितरणकडे मागणी

 

कणकवली :

 

कणकवली तालुक्यातील कळसुली गावात, वीज पुरवठा करणाऱ्या कुडाळ-आंब्रड वरुन येणाऱ्या विजवाहिनीत वारंवार बिघाड होत असल्याने, गावात नेहमीच वीजपुरवठा खंडित असतो, त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. पावसाला सुरुवात झाली, तरी लाईनवर आलेली झाडी वायरमन यांनीअजून तोडलेली नाहीत. कायमस्वरूपी गावात वायरमन, रहावेत,गावातील गंजलेले पोल तातडीने बदला. गोसावीवाडी ग्रा.प विहिरीकडील येणाऱ्या लाईनवरील झाळी हटवा.

वारंवार कुडाळ तालुक्यातील वीजपुरवठा खंडित होत, असल्याने कणकवली तालुक्यातील वीजपुरवठा मिळावा, अशा मागण्या निवेदन उपकार्यकारी अभियंता श्री.बगरे यांना देण्यात आले आहे. गावातील गंजलेले पोल तातडीने बदलू, गावांत 24तास वायरमन राहतील, लाईनवर आलेली झाळी उद्या पासून तोडण्यात येतील असं आश्वासन उपकार्यकारी अभियंता श्री.बगरे यांनी राष्ट्रवादी च्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

कळसुली गावात वारंवार होणारा खंडीत वीजपुरवठा,अवघ्या 2 दिवसांत मार्गी लावा;अन्यथा कळसुली गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस यांच्या वतीने देण्यात आला.

यावेळी कृष्णा घाडीगांवकर,भरत गावकर, लक्ष्मण गांवकर,डेव्हिड फर्नांडिस, रोहन सुद्रीक,प्रशांत घाडीगांवकर यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा