You are currently viewing अवकाळी पावसामुळे फोंडाघाट येथील जनजीवन विस्कळीत

अवकाळी पावसामुळे फोंडाघाट येथील जनजीवन विस्कळीत

फोंडाघाट

बुधवारी रात्री फोंडाघाट येथे मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली.प्रचंड उष्म्याने नागरिक हैराण झाले होते.अचानक झालेल्या पावसाने लोकांची तारांबळ उडाली.
काही जणांनी छप्पराचे काम चालु केल्याने घरात पाणी शिरले. गटार अभावी पाणी रस्त्यावर आले, त्यामूळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागली. चिखलाचे साम्राज्य पसरल्याने पादचाऱ्यांना रंगपंचमीचा अनुभव आला. त्यामूळे शाब्दिक खटकेही उडाले.
विज प्रवाह खंडित झाला. मान्सून पावसापूर्वी रस्त्यांचे गटार होण्यासाठी सार्वजानिक बांधकाम विभाग ला निवेदन देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा