You are currently viewing भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा मीडिया प्रमुख पदी दर्शन गोसावी यांची निवड

भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा मीडिया प्रमुख पदी दर्शन गोसावी यांची निवड

भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी दिले नियुक्तीपत्र

कणकवली-

कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द गावातील भाजपचे कार्यकर्ते दर्शन गोसावी यांची भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा मीडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली. भाजप आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली व भटक्या विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी ही निवड जाहीर केली. जिल्ह्यातील भटके-विमुक्त आघाडी मजबूत करण्याकरिता व आघाडीचे काम जनतेपर्यंत पोचवण्यासाठी काळे यांनी संघटनात्मक नियुक्तीपत्र देऊन गोसावी यांनी मीडिया प्रमुख पदी निवड केली.गोसावी यांना त्यांच्या निवडी बद्दल पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + fifteen =