You are currently viewing पत्रकार परिषद निमंत्रण..

पत्रकार परिषद निमंत्रण..

कुडाळ :

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था आणि कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गिरगाव, रोटरी सेवा प्रतिष्ठान कुडाळ, रोटरी क्लब कुडाळ, राष्ट्रीय बालविकास कार्यक्रम व आरोग्य विभाग सिंधुदुर्ग सुशिला गणेश निगुडकर ट्रस्ट कुडाळ, तसेच कुडाळ मेडिकल असोसिएशन व स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना सिंधुदुर्ग, आणि जिल्ह्यातील सर्व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १३, व रविवार दिनांक १४ मार्च २०२१ रोजी मुंबई येथील सुप्रसिद्ध बालरुग्ण शल्यचिकित्सक डॉ. संजय ओक यांच्या हस्ते लहान मुलांच्या आजारावर मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे कुडाळ येथील डॉ. संजय निगुडकर यांच्या  हॉस्पिटलमध्ये आयोजन करण्यात आलेले आहे. *काही अपरिहार्य कारणाने २०- २१ फेब्रुवारी२०२१ रोजी सदर शिबीर होऊ शकले नव्हते. ते आता वरील दिवशी होणार आहे.* याची माहिती डॉक्टर संजय निगुडकर, उमेश गाळवणकर व आयोजक उपस्थित राहून  देणार आहेत. यासाठी *आज गुरूवार दिनांक ११मार्च रोजी ३.३०वाजता बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात (एम आय डी सी) पत्रकार परिषदेचे आयोजन* करण्यात आले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − nine =