You are currently viewing कणकवली नगर वाचनालय बचाव फेरी उद्या निघणार

कणकवली नगर वाचनालय बचाव फेरी उद्या निघणार

वाचनप्रेमी व कणकवलीवासियांनी सहभागी होण्याचे आवाहन

कणकवली

कणकवली नगर वाचनालयाची गेल्या चार वर्षात पुरती दुरावस्था झालेली आहे. हे नगर वाचनालय म्हणजे विचारांचे धन आहे. म्हणूनच वाचन संस्कृती वाचली तरच आपण वाचू या उद्देशाने कणकवली नगरवाचनालय बचाव फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दिनांक 3 जून रोजी सकाळी 10:30 वाजता येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक ते नगर वाचानालयापर्यंत ही फेरी काढण्यात येणार आहे. कोकण गांधी कै. आप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या कणकवली नगर वाचनालयाची दुरावस्था फारच दुःखदायक आहे. विद्यमान अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी गेल्या चार वर्षापासून स्मारे 25 हजार पुस्तके गाठोडे बांधून ठेवली आहेत. नगर वाचनालयाची ही दुरावस्था अत्यंत दुर्दैवी असून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हे नगरवाचनालय वाचले पाहिजे अशी सर्वसामान्य वाचक जनतेची भावना आहे. आणि म्हणूनच नगर वाचनालय वाचविण्याच्या दृष्टीने आमचाही काही हातभार लागावा या उद्देशाने ही कणकवली नगर वाचनालय बचाव फेरी काढण्यात येणार आहे. तरी सर्व कणकवलीवासीयांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन नगर वाचनालय बचाव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा