You are currently viewing सतीश पाटणकर व संजय कात्रे यांना कोमसापचा पुरस्कार जाहीर…

सतीश पाटणकर व संजय कात्रे यांना कोमसापचा पुरस्कार जाहीर…

सतीश पाटणकर व संजय कात्रे यांना कोमसापचा पुरस्कार जाहीर…

सावंतवाडी

येथील कोमसापच्या माध्यमातून यावर्षी पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात स्व. मिलिंद भोसले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार संजय कात्रे तर दिपक नेवगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा साहित्यिक नाटककार पुरस्कार मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर यांना जाहीर करण्यात आला. सावंतवाडी शाखेची बैठक नुकतीच संपन्न झाली.

यावेळी अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, केंद्रीय कार्यकारणी सदस्य सौ. उषा परब, जिल्हा कार्यकारणी कोषाध्यक्ष भरत गावडे, सदस्य विनायक गांवस, दीपक पटेकर, प्रा. रुपेश पाटील, ॲड. नकुल पार्सेकर उपस्थित होते.

१५ मार्चला सकाळी १० वा. राणी पार्वतीदेवी हायस्कूल सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत तर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती यावेळी राहणार आहे‌त.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 8 =