You are currently viewing श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळच्या वतीने १३ एप्रिल लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन…

श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळच्या वतीने १३ एप्रिल लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन…

श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळच्या वतीने १३ एप्रिल लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन…

कुडाळ

श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळच्या वतीने श्री रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून व कै. साहिल कुडाळकर याच्या स्मरणार्थ भव्य लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा मर्यादित असून १३ एप्रिलला रात्री ११ वाजता सुरु होणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५ हजार ५५५, द्वितीय ११ हजार १११, तृतीय, ५ हजार ५५५, उत्तेजनार्थ दोन क्रमांकासाठी २ हजार ५५५, उत्कृष्ठ नर्तक आणि नर्तकीसाठी प्रत्येकी १ हजार ५५५ त्याशिवाय सर्व विजेत्यांना आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र मिळणार आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी केदार राऊळ ९९२२०७९४०८ / ९४२२०७९४०८ किंवा गौरेश कुडाळकर ८४१२००९६७७ / ९४०५७१९७०५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा