You are currently viewing माधवी पवार पोवाडा गायनात ठरली अव्वल

माधवी पवार पोवाडा गायनात ठरली अव्वल

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

सरहद कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स, कात्रज, पुणे येथे कला शाखेतर्फे कला-आविष्कार आंतरराष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन सोहळ्याअंतर्गत स्वरचित – कवितावाचन स्पर्धा, भारूड आणि पोवाडा सादरीकरण स्पर्धा आणि लोकनृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, विद्यार्थ्यांमधील भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा, इतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधता यावा या हेतूने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन केले होते.

सदर स्पर्धेत एस. एन. डी. टी. विद्यापीठ चर्चगेट येथील विद्यार्थीनी माधवी विजयकुमार पवार हिने गायलेला ‘अफजल खानाच्या वधाचा पोवाडा’ अव्वल ठरला.

कला-आविष्कार आंतरराष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन सोहळ्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या कपाटे या विद्यार्थिनीने केले तर आभार डॉ. सुनील उकले यांनी मानले.

याप्रसंगी सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, उपप्राचार्य डॉ. संगीता शिंदे, कला शाखा व मराठी विभाग प्रमुख डॉ. वंदना चव्हाण हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × three =