You are currently viewing सुटबुट वाल्या सरकार कडून गरीब विद्यार्थ्यांचा अपमान – गुलजार काझी.

सुटबुट वाल्या सरकार कडून गरीब विद्यार्थ्यांचा अपमान – गुलजार काझी.

सुटबुट वाल्या सरकार कडून गरीब विद्यार्थ्यांचा अपमान – गुलजार काझी.

वैभववाडी

सध्या मोठ्या प्रमाणात सरकारच्या विविध भागात सरकारी नोकरभरती सुरू आहे. यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी फॉर्म भारत आहेत. परंतु एका परीक्षेची फी ही जवळपास १००० रुपये आहे. ही परीक्षा फी यूपीएससी प्रमाणे १०० रुपये एवढी करावी अशी मागणी करणारे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसने या अगोदरच मा. मुख्य मंत्री यांना दिले होते.
या नंतर विधान सभेमध्ये आमदार रोहित पवार यांनी देखील ही भरमसाठ वाढलेली परीक्षा फी कमी करण्याची मागणी केली होती. या विषयवार विधानसभेमध्ये बोलताना मा. उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी हे क्लास लावण्यासाठी ५०००० रुपये फी भरतात परंतु परीक्षे साठी १००० रुपये फी भरायला नकार देतात असे उत्तर दिले. विधानसभेत बोलताना ते म्हणाले की सध्या कोणताच विद्यार्थी हा क्लास शिवाय परीक्षा देत नाही. या त्यांच्या व्यक्तव्याचा सिंधुदुर्ग जिल्हा कॉँग्रेस चे रोजगार व स्वयंरोजगार चे जिल्हा अध्यक्ष गुलजार काझी यांनी निषेध केला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे नोट्स घेण्यासाठी देखील पुरेसा पैसा नसताना क्लास साठी ५०००० रुपये कुठून आणणार ? असा सवाल सवाल गुलजार काझी यांनी केला आहे.
नुकत्याच निघालेल्या जिल्हा परिषद नोकरभरती मध्ये प्रत्येक पदासाठी स्वातंत्र फॉर्म भरावा लागत आहे आणि त्यासाठी प्रत्येक फॉर्म साठी विद्यार्थ्यांना १००० रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला दोन किंवा तिन पदासाठी फॉर्म भरायचा असल्यास त्याला २ ते ३ हजाराचा भुर्दंड फक्त जिल्हा परिषद भरती साठी बसणार आहे. हे सुटबुट वाले सरकार अशा प्रकारे विद्यार्थ्यांवर अन्याय करून परीक्षा घेणाऱ्या खाजगी कंपन्यांची तुंबडी भरत असल्याचा आरोप गुलजार काझी यांनी केला आहे.
मा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणतात सीरियस विद्यार्थी परीक्षेला बसावेत म्हणून परीक्षा फी १००० ठेवली. मग जो विद्यार्थी १००० रुपये भरू शकत नाही तो सीरियस नाही का ? फडणवीस साहेबांचे हे वक्तव्य म्हणजे घाम गळून कष्ट करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब जनतेचा व गावाकडून आलेल्या तुटपुंज्या पैशावर गुजराण करत एका नोकरी साठी अहोरात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपमान आहे असे देखील कॉँग्रेस चे रोजगार स्वयंरोजर जिल्हा अध्यक्ष गुलजार काझी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + four =