You are currently viewing बेरोजगाचा कारखाना

बेरोजगाचा कारखाना

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती, सांगली जिल्हा संस्थापक-अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख

पूर्वी लोकांना शिक्षणाचे महत्व कळत नव्हतं इंग्रजांनी लोकांना थोडंफार म्हणजे कारकून बनवता येईल एवढंच शिकवलं इंग्रज गेले आणि शिक्षणाचा अभाव आपल्याला जाणवायला लागला . आपल्यातील काही समाज प्रतिष्ठीत लोकांना शिक्षण असावे लोकांना मिळावे यासाठी गावाच्या पायाखाली बिगर भिंतीच्या शाळा भरण्यास सुरुवात झाली. लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नव्हते * शिकून काय करायचं आहे* असं मत लोकांचं होतं. शिक्षणाची गंगा लोकांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी समाजातील समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले. सावित्रीबाई फुले. छत्रपती शाहू महाराज . बिबी फातिमा . असे बरेच समोर येऊन ज्ञानाचे काम करत होते. काहीजण पडद्याच्या मागून यांना पाठिंबा देत होतें . पण आपल्या समाजातील काही समाजकंटक लोकांनी या समाजसेवा करणारे शिक्षणाचे पुजारी याचा शिव्या . शेणघान अंगावर टाकणं. बहिष्कार करणे. असा अमानुष छळ केला. पण या लोकांनी आपला लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचा अनमोल मार्ग सोडला नाही . अडाणी. गरजू लोकांचे समाजात मानसिक शारीरिक शोषणच केले जाते हे लोकाना कळलं पाहिजे .
शिक्षण ही अध्ययन सुकर करणे, किंवा ज्ञान, कौशल्य, मुल्ये, विश्वास व सवयींच्या प्राप्तीची प्रक्रिया आहे. अध्यापन, प्रशिक्षण, कथा सांगणे व संचलीत [संशोधन यांचा शैक्षणिक पद्धतीत समावेश होतो. शिक्षण हे वारंवार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होत असते, तथापि विद्यार्थी स्वतःला सुद्धा शिकवू शकतात. शिक्षण हे औपचारिक किंवा अनौपचारिक वातावरणात होऊ शकते व प्रत्येक अनुभव ज्याचा व्यक्तीच्या विचार करणे, अनुभवणे किंवा कृतींवर प्रगत परिणाम असतो त्यास शैक्षणिक गृहीत धरता येते.
शिक्षण जीवनाची गरज असणारी आज सर्वत्र नेते पुढारी खासदार आमदार मंत्री यांनी व यांच्या बगलबच्चे यांची शिक्षणसंस्था रजिस्टर करून जनतेला लुटण्याचा बरोबर कार्यक्रम लावला आहे. मनमानी फि आकारणी . पुस्तकाचे ओझ. नाकारा शिक्षक स्टाफ. शासकीय अनुदान. अशा विविध मार्गांनी फक्त आणि फक्त पैसा मिळविण्याचे धोरण आखले जाते. आणि शिक्षणाच्या धोरणांचे बारा वाजवले जातात.
आपल्या वाड्या वस्त्या गावात शहरात असणारी विविध शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये उच्च माध्यमिक विद्यालय विविध स्पर्धा परीक्षा वर्ग विविध औद्योगिक शिक्षण संस्था. अशा अनेक शिक्षण संस्था गोरगरीब लोकांच्या आहेत कां? एखाद्या समाजाच्या आहेत कां? नाहीत हे सर्व नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांच्या काळा पैसा पांढरा करण्यासाठी काढलेल्या संस्था आहेत कारणं शिक्षण संस्था आणि देवालय यांचे कधीही अॅडिट होत नाही कधी चौकशी होत नाही कारणं हे सर्व समाजासाठी व गोरगरीब जनतेसाठी शिक्षणाचा आणि भावनेचा बाजार करण्याचा अड्डा आहे . म्हणजे गोरगरिब मुलांच्या पालकांना लुटण्याचा एक साधा आणि सोपा मार्ग आहे.
आज शिक्षण संस्था काढणे ही एक फॅशन झाली आहे. एखाद्या शिक्षण संस्थेतील चार शिक्षक बाहेर पडतात आणि शिक्षण संस्था काढतात. त्यात निवासी शाळा. असा एक फंडा आज गाजत आहे. सर्व शिक्षक मिळून संस्था रजिस्टर करतात एखाद्या फोंडया माळावर जमीन भाडेतत्वावर घेतली जाते. आणि मग ज्याची कधीही चौकशी होत नाही अशी रक्कम म्हणजे देणगी गोळा करण्याचे काम सुरू होते . शिक्षणाची आणि मुलांचे भवितव्य याचे भांडवल करून लोकांकडून बांधकाम साहित्य विट. वाळू. सिमेंट. सळी. पाण्याचे टँकर. काम करणारे मजूर. असे विविध लाखों रुपयांचे साहित्य फुकट गोळा करून शाळेचे काम सुरू केले जाते. आणि मग त्या त्या जिल्ह्यातील नामांकित नेते पुढारी आमदार खासदार मंत्री हे सुद्धा कमिशन बेसवर आणि आपल्या पदाच्या जोरावर व्यापारी. बिल्डर. यांना दम देण्यास सुरुवात करतात. त्यातून काही राजकीय नेते अस सुध्दा करतात की माझ्या आई. वडील. भाऊ . यांचें नाव देण्याचे फायनल असेल तरच त्या शिक्षण संस्थेला रजिस्ट्रेशन किंवा आर्थिक मदत करण्यास तयार होतात म्हणजे बेरोजगार तयार करण्याचा कारखाना तयार झाला .
एवढ्या शिक्षण संस्था आहेत त्यामध्ये फक्त पुस्तकी ज्ञान दिल जात. पालकांना मूर्ख बनवून मनमानी डोनेशन. फि . वसुल केली जाते . पण या फुकटच्या देणगीवर तयार झालेल्या संस्था समाजातील काही गोरगरीब वंचित मुलांना मोफत शिक्षण देणार काय? सर्वात मोठा प्रश्न आहे आज आपल्या मला काय वाटतं नाही हे मोफत शिक्षण देतील . अशा संस्था काही दिवस सुरळीत चालतात आणि त्यांनंतर शासनाला सुध्दा आपल्या शिक्षणाची भुरळ पाडून शासकीय अनुदान लुटले जाते शासन निवासी व अनिवासी. आश्रम शाळा यामध्ये शिकणारया मुलांना चप्पल कपडे. खाण्यास जेवन. स्वच्छ पाणी. तेल साबण. वापरण्यासाठी संडास बाथरुम. रहाण्यास व अभ्यास करण्यास. शिकण्यास मुबलक जागा. सुरक्षितता. पुस्तक वह्या. उत्कृष्ट शिक्षक स्टाफ अशा सर्व गोष्टी शासन पुरवत असते. मग या अशा शिक्षण संस्था मुलांच्या पालकांकडून फी चया नावाखाली पैसे का? उकळतात आपण कधी चौकशी केली आहे का? म्हणजे शिक्षण संस्था शिक्षणाच्या नावाखाली गोरख धंदा चालवत आहेत.
पुस्तकी ज्ञानापेक्षा आज गरज आहे ती म्हणजे व्यवसायिक शिक्षणाची ती म्हणजे . गवंडी. पलमबंर.लोहारकाम . पेंटींग. फॅब्रिकेटर. खुदाई. सेंट्रिंग . वेल्डिंग. औद्योगिक शिक्षण. भाजीपाला फळे फुले विक्री. हाॅटेल मॅनेजमेंट. सेल्समन. वडापाव चायनीज. बेकरी उत्पादने. अशी नाही अनेक व्यवसायिक शिक्षण जर आज पुस्तकी ज्ञानाबरोर देता आले तर तरूण पिढी सक्षम होण्यास वेळ लागणार नाही . पण हे शिक्षण देण्यासाठी आज शिक्षक तयार नाही.
आपल्या केंद्राकडून पंतप्रधान कला कौशल्य विकास अशी योजना राबविण्यात येते. कमवा आणि शिका. पण यामध्ये निवडलेले कोर्स मुलांच्या उपयोगाचे नाहीत. प्रत्येक जिल्ह्यात असे पंतप्रधान कला कौशल्य विकास योजनांची संस्था आहे पण फक्त आणि फक्त जागाभाडे मिळविण्यासाठी . आणि अश्या योजना चालविण्याचा अधिकार दिला जातो तो नेत्यांनाच . परवा सुध्दा बांधकाम कामगार यांच्या मुलांना सक्षम करण्यासाठी कला कौशल्य विभागाकडून विविध कोर्सेस मोफत देण्यात आले होते. पण त्यातील एकही कोर्स बांधकाम कामगार मुलांच्या दृष्टीने उपयोगी नव्हता मग शासनाचा पैसा आणि बांधकाम कामगार यांच्या मुलांचा वेळ वाय गेला
यामुळे आज शिक्षण संस्था बेरोजगारांचा कारखाना आहे अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × three =