You are currently viewing कळसुली गावातील वीज समस्या संदर्भात शिवसेना कळसुली पदाधिकाऱ्यांनी घेतली कार्यकारी अभियंता यांची भेट

कळसुली गावातील वीज समस्या संदर्भात शिवसेना कळसुली पदाधिकाऱ्यांनी घेतली कार्यकारी अभियंता यांची भेट

कणकवली

कळसुली गावातील वीज समस्या संदर्भात शिवसेना कळसुली पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली. विविध विषया वरील चर्चेअंती कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ कामे केली जातील असे आश्वासन दिले. त्यानुसार…

1) कळसुली गावात कुडाळ तालुक्यातून आंब्रड मार्गे येणाऱ्या वीजवाहिनी मुळे वारंवार गावात उद्भवणारी विजेची समस्या यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून कणकवली तालुक्यातून शिरवल ते कळसुली नवीन 2 कि.मीअंतराची लिंक लाईन टाकण्याचे ठरवण्यात आले त्यासाठी शिवसेना खासदार विनायक राऊत साहेब ओरोस कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला लवकरच या कामाला मंजुरी मिळून पावसाळ्यानंतर सदर लाईन टाकून होईल असे सांगण्यात आले.
2) तसेच गावातील धोकादायक स्थितीत असलेले वीजखांब तात्काळ बदलण्याचे आदेश देण्यात आले पावसाळ्याआधी अतिधोकादायक पोल बदलण्यात येतील.
3) येत्या पावसाळ्यात वायरमन 24 तास गावात उपलब्ध राहण्याचे आदेशही देण्यात आले.
4) गावातील खराब झालेले डीपी बॉक्स नवीन बदलून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्री शैलेश भोगले ,सुशांत दळवी ,चंदू परब, संतोष सुतार ,नंदकिशोर परब ,सुनील हरमलकर व वायरमन गावकर, सावंत उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा