You are currently viewing कोरोनामुळे नवीन शैक्षणिक वर्षात मोठा बदल….

कोरोनामुळे नवीन शैक्षणिक वर्षात मोठा बदल….

यंदा १ नोव्हेंबर २०२० ते २९ आॅगस्ट २०२१ असे शैक्षणिक वर्ष

पुणे :

विद्यापीठ अनुदान आयोगाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचे पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार प्रथम वर्षासाठी १ नोव्हेंबर २०२० ते २९ आॅगस्ट २०२१ असे शैक्षणिक वर्ष असणार आहे. त्यात दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्ट्या कमी केल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बारावीच्या निकालासह महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यावर परिणाम झाला.

विद्यापीठ अनुदान आयोगाने यापूर्वी दोन वेळा शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × two =