टाटा मेटालीकच्या जागेत प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ यांचे उपोषण 

टाटा मेटालीकच्या जागेत प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ यांचे उपोषण 

सावंतवाडी :

रेडी गावात बंद असलेल्या टाटा मेटालीकच्या जागेत प्रोजेक्ट सुरू करावा अशी ग्रामस्थांची मागणी होती. प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सक्षम अधिकारी आले नव्हते. त्यामुळे आज २६ जानेवारीला रेडी ग्रामपंचायत मार्फत प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात आले. तर प्रकल्प सुरू करावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या जागा परत कराव्या असा इशारा माजी आरोग्य सभापती, जि.प.सदस्य प्रितेश राऊळ यांनी दिला. यावेळी सरपंच रामसिंग राणे, सदस्य विनोद नाईक, आनंद भिसे, अनंत कांबळी, गफार खानापूरे, प्रभाकर राऊळ, संतोष राणे, संतोष राणे, पिंट्या राणे, पुरुषोत्तम राणे, जय राणे, गफार खान, प्रभाकर राऊळ, अनंत कांबळी, संतोष मांजरेकर,प्रथमेश इब्रामपूरकर, नितीन परब, अमित राणे आदी उपस्थित होते. तर नगराध्यक्ष संजू परब यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा