You are currently viewing बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात 23 रोजी मोफत रक्त तपासणी शिबिर

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात 23 रोजी मोफत रक्त तपासणी शिबिर

शिवतेज सेवा संस्थेच्यावतीने आयोजन

बांदा

येथील शिवतेज सेवा संस्थेच्या वतीने सोमवार दिनांक २३ रोजी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी साडेसात ते दुपारी १२ या वेळेत मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवतेज संस्था शहरात गेली ४ वर्षे सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. ३० वर्षे वयोगटा वरील व्यक्तींना शारीरिक व गंभीर आजारातून मुक्तता मिळावी यासाठी संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून या भव्य रक्त तपासणी शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थ्यांनी ८ ते १० तासापूर्वी काहीही न खाता तपासणी करायची आहे. या शिबिरात CBC, LFT, KFT, TFT ( थायरॉईड ), PCR HBV, PCR HCV या टेस्ट मोफत करण्यात येणार आहेत. उपाशीपोटी टेस्ट करण्यात येणार असल्याने रुग्णांनी सकाळी लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा